Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायगडचं 800 कोटींचं नुकसान, आता जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा

 

 

महाड:  वृत्तसंस्था । रायगडमध्ये  आता कोरोनाचा संसर्ग  व साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, जिल्ह्यात 100 डॉक्टरांचं पथक काम करत आहे  महापुरामुळे जिल्ह्याचं 800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं.

 

महापुरानंतर रायगड जिल्ह्याला लोकांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. रायगडमध्ये अनेक लोक येत आहेत.

 

रायगड जिल्ह्यात बाहेरून भरपूर लोकं मदत घेऊन येत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती जास्त आहे. या शिवाय साथीचे आजार पसरण्याची भीती जास्त आहे. मात्र साथीच्या आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महाड शहर आणि जिल्ह्यात 100 डॉक्टरांची पथकं तयार करण्यात आली आहेत. औषध आणि गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला आहे.   रायगड जिल्हा परिषदेला 2500 कोरोना अँन्टीजेन चाचणी किट देण्यात आल्या आहेत, असं तटकरे यांनी सांगितलं.

 

जिल्ह्यात फंगल इन्फेक्शनच्या केसेस आढळायला सुरुवात झाली आहे. त्याची आकडेवारी अजून हाती आली नाही. मात्र उद्या दुपारपर्यंत जिल्ह्यातील सगळा आकडा प्रसिद्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.

 

महापुरामुळे रायगड जिल्ह्यात साधारण 800 कोटी रुपयांच नुकसान झालं आहे गेल्या दोन वर्षात रायगडवासियांना विविध संकटांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत केली पाहिजे. तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे करून मदत लवकरात लवकर जिल्ह्याला मदत मिळायला हवी, असंही त्या म्हणाल्या.

 

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य गावांच स्थलांतर 8 महिन्यात करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तळीये ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

Exit mobile version