Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम रोटी आश्रमाच्या सेवाकार्यांसं एक तप पुर्ण

मुक्ताईनगर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील राम रोटी आश्रमाच्या सेवाकार्यांसं एक तप म्हणजेच १२ वर्ष पुर्ण झाले आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर शहरात १५ वर्षांपासून अखंड संत-महापुरुषांच्या विचार कार्यावरील चालू असलेली मानव सेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली पपु गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम येथे  दर महिन्याच्या एकादशी वारीला सुरू असलेल्या फराळदान या कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे आश्रमात आजचे फराळदाते डॉ.  एन. जी. मराठे गायत्री हॉस्पिटल मुक्ताईनगर यांच्याकडुन यश मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त  उत्पत्ती एकादशीला आईसाहेब संत मुक्ताईच्या नगरीत येणाऱ्या वारकर्‍यांना साबुदाणा खिचडी फराळ वाटप करण्यात आले.

 

Exit mobile version