Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठींबा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (वृत्तसंस्था) राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठींबा असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

मुश्रीफ म्हणाले, तसेच ठाकरे सरकारला १०० दिवस पुर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचाही सहभाग असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचे अगोदरच घोषीत केले होते. महाविकास आघाडीच्या सरकारचे शंभर दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या दोन-तीन योजना मार्गी लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे.

Exit mobile version