Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिरासाठी फक्त एक कोटी देताना उद्धव ठाकरेंना लाज नाही वाटली : नितेश राणे

मुंबई (वृत्तसंस्था) मुलाच्या पेग्विंन हट्टासाठी ४५ कोटी रुपये, पण राम मंदिरासाठी फक्त कोटी रुपये, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे शनिवारी अयोध्येच्या दौऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ठाकरे यांच्या या घोषणेवर आमदार नितेश राणे यांनी ‘लाज नाही वाटली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना, मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???,’ अशा शब्दात टीका केली आहे.

Exit mobile version