Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात ; पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये दाखल झाले असून दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील.

 

या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणि प्रवेश दिला जाणार आहे. अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ देखील सकाळीच अयोध्येत दाखल झाले आहेत.

Exit mobile version