Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम खांडेकर यांचे निधन

 

 

नागपूर : वृत्तसंस्था । माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचे  काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी  नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं.

 

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुकूल, सून संगीता, दोन नातवंडं असा परिवार आहे. खांडेकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी म्हणून काम केलं होतं.

 

१९८५ साली नरसिंह राव यांनी त्यांचा रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती. १९९१ मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली. खांडेकर यांनी राव यांच्या निधनापर्यंत त्यांच्यासोबत काम केलं.

 

खांडेकर यांनी अनेक वर्तमानपत्र आणि मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेखही लिहिले. अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींसंदर्भातले ६० ते ७० लेख लिहिले.

राजकारण क्षेत्रासंदर्भातल्या त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या अनुभवांबद्दल ते   स्तंभलेखनही करत होते. २०१९ साली हे सर्व लेख ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित करण्यात आले.

 

Exit mobile version