रामेश्वर कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ पुन्हा गटार तयार करा, महापौरांच्या सूचना ; प्रत्यक्ष भेट देत जाणून घेतल्या तक्रारी

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारताना संरक्षक भिंतीलगत असलेली गटार बंद करण्यात आली. नागरिकांना त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांनी महापौर यांच्याकडे केली होती. गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली तसेच मनपा अभियंता यांना सूचना देत गटार पुन्हा बांधण्याच्या सूचना केल्या.

 

पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी उभारल्यानंतर सभोवताली संरक्षक भिंत उभारताना बाजूला असलेली गटार बुजण्यात आली होती. गटार बंद झाल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास होत होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेविका सुरेखा सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. उमेश सोनवणे यांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांना सांगितले असता महापौरांनी तात्काळ रामेश्वर कॉलनी गाठली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक आणि मनपा अभियंता उपस्थित होते. महापौरांनी मनपा अभियंता आणि मक्तेदाराच्या प्रतिनिधीला याबाबत सूचना देत गटार नव्याने तात्काळ बांधण्याचे सांगितले.

Protected Content