Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामेश्वर कॉलनी परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना २७ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहतात. २६ मार्च रोजी रात्री आईवडीलांसोबत जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळवून गेल्याचे उघडकीला आले. परिसरातील नागरीक व नातेवाईकाकडे शोधाशोध केली असता मिळून आली नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रामकृष्ण पाटील करीत आहे.

Exit mobile version