Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामेश्वर कॉलनीत तृतीयपंथीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनतील तृतीय पंथीने राहत्या घरात गळङ्गास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमी जवळील रहिवासी विक्रांत उर्ङ्ग विक्की लैला मनोहर खरकार (वय-२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळङ्गास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळङ्गास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी मनहेलावरणारा आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्याची वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्याच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु हाते.

Exit mobile version