Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामेश्वर कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात येणाचा जाब विचारल्याच्या कारणावरून तीन जणांनी तरूणाला शिवीगाळ करून दगड मारून दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हरी पाटील (वय-२१) रा. प्रियंका किरणा दुकानाजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण वास्तव्याला आहे. त्याच्या घराच्या शेजारी प्रतिक अशोक पांडूळे हा राहतो. रविवारी ३१ जुलै रोजी रात्री प्रतिक हा संदीप पाटीलच्या घरी आला होता. यावेळी घरी येण्याचे कारण संदीपने विचारल्याने प्रतिकला राग आला. प्रतिकसह त्याची आई व वडील या तिघांनी मिळून संदीप पाटील याला शिवीगाळ करून मारहाण केली. तर प्रतिकने हातातील दगड डोक्यात मारून दुखापत केली.

याबाबत संदीप पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी १ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा प्रतिक अशोक पांडूळे याच्यासह त्याची आई व वडील या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Exit mobile version