Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामविलास पासवान रुग्णालयात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी शुक्रवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचं सांगितलंय. आपल्या अनुपस्थितीत मुलगा चिराग पासवान याच्याकडे पक्षाची सूत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार व एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान जे निर्णय घेतील, ते अंतिम निर्णय असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपासून रामविलास पासवान आजारी असल्याच्या काही बातम्या येत होत्या. मात्र, तब्येत खालावल्याचं लक्षात आल्यानंतर रामविलास पासवान यांनी ही माहिती उघड केलीय. मात्र, आजारासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही.

‘कोरोना संकटकाळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यसााठी आणि योग्य वेळी खाद्यसामग्री जागेवर पोहचण्यासाठी हरएक प्रयत्न केले. याच दरम्यान तब्येत आणखीन खालावू लागली परंतु, कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचं टाळलं होतं. परंतु, माझी तब्येत ढासळल्याचं चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरून मी रुग्णालयात दाखल झालो आहे’ असं रामविलास पासवान यांनी म्हटलंय.

‘आगामी बिहार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक पार पडली होती. जवळपास १४३ जागांवरून उमेदवार रिंगणात उतरवण्याची पक्षाची तयारी झालीय.

Exit mobile version