Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणे बंधू व राऊतांवर बंदी घाला : भाजपच्या माजी खासदारांची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात विखारी बोलण्याची जणू काही स्पर्धाच सुरू असतांना भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी राणे बंधू आणि संजय राऊत यांच्यावर मीडियाने बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यात प्रामुख्याने निलेश राणे यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली असून ठिकठिकाणी त्यांचा निषेध होत आहे. तर यानंतर आज शरद पवार आणि संजय राऊत यांना जिवे ठार मारण्याची धमक्या आल्या. राजकीय वर्तुळातून या सर्व प्रकारांचा निषेध होत असतांना माजी खासदार संजय काकडे यांनी महत्वाचा मुद्दा मांडला आहे.

 

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय काकडे म्हणाले की, निलेश राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेचा मी वैयक्तिक निषेध करतो. संजय राऊत, निलेश राणे, नितेश राणे यांच्यावर मीडियानेच बंदी घातली पाहिजे. संजय राऊत आणि राणेंकडे मीडियाने आजिबात जाऊ नये, असे आवाहन काकडे यांनी केले. तसेच, आपण स्वतः या प्रकारांबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाहा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहीणार आहे. शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीबाबत असे बोलल्याने आमच्या पक्षाची् प्रतिमाही खराब होत आहे. राणे जे काही बोलले असतील हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पक्षाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे काकडे म्हणाले.

Exit mobile version