राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज निर्णय

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठन प्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होउन बेल मिळते कि लांबते यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या खा. नवनीत राणा आणि आ. रवि राणा दाम्पत्य ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसा पठन करण्याच्या आग्रही भूमिकेसह प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांतर्फे त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर न्यायालयाने जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सध्या कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याने त्यांना घरचे जेवण मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला असून त्यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरकार पक्षातर्फे त्यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितला होता, त्यानुसार सरकार पक्षातर्फे मुंबई पोलिस त्यांची भूमिका लेखी स्वरुपात न्यायालयात सादर करतील, तर आज राणा दांपत्यालाहि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ न्यायालयाकडून मिळण्याची शक्यता आहे.

परंतु, सरकार पक्षाची भूमिका लक्षात घेता, राणा दांपत्य तुरुंगाबाहेर पडल्यास, त्यांना जामीन दिल्यास पुन्हा आपत्तीजनक वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करु शकतात, असा युक्तीवाद सरकारतर्फे राणा दांपत्याच्या या जामीन अर्जाला विरोध केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राणा दांपत्याला आज न्यायालयात दिलासा मिळतो की नाही हे सुनावणीनंतरच काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

Protected Content