राज्य सरकार इंधनावरील कर कमी करणार नाही ! : थोरात

नाशिक | राज्याचे जीएसटीचे ५० हजार कोटी रूपये अद्यापही केंद्राने दिले नसल्यामुळे महाराष्ट्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 

केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी याच प्रकारे कपात केली आहे. तर महाराष्ट्रात अद्यापही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे जीएसटीचे ५० हजार कोटी रुपये केंद्राने अद्याप दिले नसल्याचे त्यांनी म्हटले.

इगतपुरी तालुक्यात कॉंग्रेसच्यावतीने  इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या सभेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी केंद्राने अद्यापही दिले नाहीत. कोरोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांना सरकारी सेवेत घेणे शक्य नसल्याचे भाजपच्या तत्कालीन प्रमुख मंत्र्याने म्हटले होते. आता भाजप आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी म्हटले. एसटीच्या खासगीकरणाबाबत चर्चा होत असेल. मात्र, त्याबाबत आम्हाला अधिकृतपणे माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content