Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात यावा : खा. खडसे

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली आहे.

 

खासदार रक्षाताई खडसे यांनी आज शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी  रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन रावेर मतदारसंघातील राज्य  महामार्गांना राष्ट्रीय महार्गाचा दर्जा देण्याची मागणी केली. रावेर लोकसभा क्षेत्रातील नशिराबाद-सूनसगाव-कुऱ्हा-बोदवड-मलकापूर-शेगाव रस्ता, सावदा-हतनूर-चांगदेव-कोथळी-हरताळा-माळेगाव-बोदवड फाटा रस्ता, फागणे-अमळनेर-चोपडा-खरगोन (मध्यप्रदेश) रस्ता व पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग आहेत.  यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण असते. या रस्त्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून सदर रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे सदर राज्यमार्ग यांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा. तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला बुऱ्हानपूर-अंकलेश्वर हा महामार्गाच्या राष्ट्रीयकरणाला गती देण्यात येऊन तत्काळ त्यांची सुधारण करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार  रक्षाताई खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

Exit mobile version