Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण

 

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | खिरोदा येथे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारांना हेल्मेट वाटप आणि मूकनायक व जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ना. ठाकूर यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

 

राज्य मराठी पत्रकार संघाचा हा उपक्रम  कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार ना. यशोमती ठाकूर यांनी याप्रसंगी काढले. भारताचा मूळ गाभा हा सर्वसमावेशकतेचा असून आज संविधानावर आघात करण्याचे प्रयत्न होत असून याच्या संरक्षणासाठी आम्ही लढा देत आहोत. या लढ्यात पत्रकारांनी आम्हाला सहाय्य करावे असे आवाहन देखील ना. यशोमती ठाकूर यांनी याप्रसंगी केले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रवीण सपकाळे, किशोर रायसाकडा, कमलेश देवरे, नाजनीन शेख आदींसह त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version