Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालाया मार्फत ६१ वी महराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२२-२३ ची प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर २४ नोव्हेंबर पासून दररोज सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होणार आहे.

 

महराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रावर २४ नोव्हेंबर २०२२ ते ७  डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण १३ नाटक सादर केली जाणार आहेत. या स्पर्धेत इंदौर येथील संस्थांनी सहभाग घेतला आहे.या  स्पर्धेत सहभागी होणारे नाटक दिनांक,  नाटक, सादरकर्त्या संस्था, लेखक आणि  दिग्दर्शक  खालील प्रमाणे,

२४ नोव्हेंबर अजूनही चांदरात आहे, सुबोध बहुउद्देशीय युवा विकास प्रतिष्ठान जळगाव, लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक भावेश सोनार. २५ नोव्हेंबर  जुगाड, संजीवनी फाउंडेशन जळगाव, लेखक दिग्दर्शक  प्रदीप भोई.  २६ नोव्हेंबर अर्यमा उवाच,  समर्थ बहुउद्देशीय संस्था मु. पो. जवखेडे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव,  लेखक सोमनाथ नाईक दिग्दर्शक विशाल जाधव. २७ नोव्हेंबर मडवाॅक, मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव, लेखक श्रीपाद देशपांडे, दिग्दर्शक दिनेश माळी, २८ नोव्हेंबर सुखांशी भांडतो आम्ही, मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदौर, लेखक अभिराम भडकमकर,दिग्दर्शक पंकज वागळे,२९ नोव्हेंबर अशुद्ध बीजापोटी, सार्थक सांस्कृतिक कला संस्था इंदौर,लेखक केदार देसाई,दिग्दर्शक सतीश पुरी,१ डिसेंबर रतन,लेवा एज्युकेशन युनियनचे डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव, लेखक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, दिग्दर्शक सुचित्रा मुंग्रे. २ डिसेंबर मुसक्या, कै. शंकररावजी काळूंखे चरिटेबल ट्रस्ट, जळगाव ,लेखक दिग्दर्शक डॉ. हेमंत कुलकर्णी. ३ डिसेंबर राशोमान, इंदाई फाउंडेशन जळगाव बंदरखे ता. पाचोरा जि. जळगाव लेखक अनंत भावे,दिग्दर्शक रमेश भोळे. ४ डिसेंबर काय डेंजर वारा सुटलाय, ज्ञानसागर ग्रंथालय, वाचनालय, वाचनालय कार्यालय, राखुंडे नगर ता. चाळीसगाव जि. जळगाव,लेखक जयंत पवार,दिग्दर्शक महेंद्र खेडकर, ५ डिसेंबर एक रोज, कलरबोव मल्टीपर्पज                     फाउंडेशन,जळगाव लेखक दिग्दर्शक आकाश बाविस्कर,६ डिसेंबर वेडात म्हातारे वेगात दौडले तीन , भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर ता. भुसावळ, जि. जळगाव ,लेखक प्रकाश गावडे, दिग्दर्शक नितीन देवरे. ७ डिसेंबर  पुन्हा सालवा जुडूम, अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान,जळगाव, लेखक शरद भालेराव,दिग्दर्शक चिंतामन पाटील.

 

Exit mobile version