राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा अजून नाही

मुंबई वृत्तसंस्था | प्रेक्षक आणि कलावंतांना प्रतीक्षा असणाऱ्या ‘राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा अजून नाही’ असं म्हणत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. .

राज्यातील ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्य नाट्य स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी विनंती केली होती. त्यामुळेच येत्या १५ जानेवारी पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे संसर्ग कमी झाल्यानंतर नाट्यकर्मींच्या आवडत्या राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

१५ जानेवारीपासून ६० व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होणार होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी परशुराम सायिखेडकर नाट्यगृहात रंगणार होती. परंतू वाढणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

Protected Content