Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याला स्थिर सरकार देणार- अजित पवार ट्विटरवर सक्रीय

Ajit Pawar

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांचे शुभेच्छांसाठी आभार मानून राज्याला स्थिर सरकार देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी ट्विटद्वारे केली आहे.

अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २२ तारखेनंतर कोणतेही अपडेट करण्यात आले नव्हते. अगदी काल त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी कोणतेही ट्विट केले नाही. आता मात्र त्यांनी ट्विटरवर सक्रीय होऊन एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत. यात त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य मान्यवरांचे उपमुख्यमंत्रीपदाबद्दल शुभेच्छा दिल्यानंतर आभार मानले आहे. मोदींचे आभार मानतांना त्यांनी महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार असून जनतेची सेवा करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यासोबत त्यांनी नितीन गडकरी, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस आदींसह अन्य नेत्यांचेही आभार मानले आहेत.

खाली पहा : अजित पवार यांनी केलेले ट्विट

Exit mobile version