Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदीची शक्यता

 

नागपूर :  वृत्तसंस्था । कोरोना रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या विचारात  आहे. तसे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. संध्याकाळी  ६ ते सकाळचे  ९  या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे.

 

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्याठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. .

 

नाईट कर्फ्यूविषयी बोलताना “मास्क लावणं, गर्दी टाळणं या गोष्टी नागरिकांनी पाळाव्यात. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे.  लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

 

नाईट कर्फ्यूचे संकेत दिल्यानंतर राज्यात एकाच वेळी कर्फ्यू लागू केला जाणार का?, असा प्रश्न नागिरकांना पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधीचे अधीकार दिले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं.  प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या. कोरोनाचा प्रसार, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नाईट कर्फ्यू संदर्भात तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील , असे वडेट्टीवार म्हणाले.

 

 

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही,” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले.

 

Exit mobile version