Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ; नारायण राणेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. हजाराच्या जवळपास मृत्यू झाले हे पाहता राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी अपयशी ठरले आहे. म्हणून राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

 

नारायण राणेंनी मागणी केली आहे की, सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि महाराष्ट्रात-मुंबईत होणारे मृत्यू थांबवावेत. या दृष्टीने प्रयत्न करावेत. काही सूचनाही केल्या. मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. अनेक रुग्णांना अॅडमिट न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी. राज्यपालांनी लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये? हे सरकार उपाययोजना करु शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी,असेही श्री. राणे म्हणाले.

Exit mobile version