Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात रस्त्यांची १ हजार ८०० कोटींची हानी

 

मुंबई : वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे राज्यात रस्त्यांची १ हजार ८०० कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज बांधकाम खात्याने व्यक्त केला आहे

 

गेल्या काही दिवसात पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. तुफान पाऊस, पूर, जमीन खचणं, दरड कोसळणं अशा नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांची घरं, संसार उध्वस्त झाले, अनेकांनी प्राण गमावले. राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं. याा तुफान पावसाने राज्यातल्या रस्त्यांनाही सोडलं नाही. या पावसामुळे रस्त्यांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. नुकसानीचा आकडा मात्र थक्क करणारा आहे.

 

राज्यात अतिवृष्टी, महापूर आणि दरड दुर्घटनांमुळे राज्याच्या रस्त्यांचं सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक म्हणजेच सुमारे ७०० कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”

 

 

 

Exit mobile version