Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे फेरबदल

मुंबई: वृत्तसंस्था । राज्यातील ठाकरे सरकारने अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. अनेक नेत्यांची सुरक्षा रद्द केली आहे. काही नेत्यांची सुरक्षा दर्जा वाढवून काहींच्या सुरक्षेत कपात केली आहे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ही सुरक्षा कपात करण्यात आली आहे. उज्ज्वल . निकम यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आधी वायप्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करण्यात आली आहे. सिन्हा यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची झेडप्लस सुरक्षा काढून त्यांना एस्कॉर्टसह वायप्लस, एम. एल. टाहिलीयानी यांची झेड सुरक्षा काढून वाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. जी. ए. सानप यांचीही झेड सुरक्षा काढून वाय सुरक्षा देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाव वाय सुरक्षा देण्यात आली आहे.

अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे अध्यक्ष राम राजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना वायप्लस एस्कॉर्टसह, आमदार वैभव नाईक यांनी एक्स, संदिपन भुमारे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे

Exit mobile version