Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील मागासवर्गीयांवर वाढता अत्याचार ; रिपाइंतर्फे जाहीर निषेध

जामनेर, प्रतिनिधी । राज्यातील पिंपरी चिंचवड,नागपूर येथे घडलेल्या निंदनीय घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी रिपाइं युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी तहसिलदार कार्यालयात निवेदन देऊन निषेध नोंदविला.

पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड येथे सवर्णं मुलीसोबत प्रेम होते म्हणून विराज जगताप या मागासवर्गीय युवकाची हत्येसारखी निंदनीय घटना घडली. तसेच नागपूर येथील अरविंद बनसोडे या युवकाचीही काही फोटो काढण्यावरूच्या वादात मारहाणीमुळे म्रुत्यु झाल्याने या निंदनीय घटनांचा योग्य व जलद गतीने तपास होवून दोषींना लवकर कारवाई होवून कडक शासन व्हावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी रविंद्र बाविस्कर, रत्नाकर जोहरे,ईश्वर सपकाळे, गणेश सपकाळे, अशोक इंगळे आदी हजर होते .

Exit mobile version