Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातलं सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर आता पुणे

 

पुणे : वृत्तसंस्था । पुणे आता अधिकृतपणे राज्यातलं सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर ठरलं आहे.

 

राज्य सरकारने काल पुणे महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा अध्यादेश काढला आणि २३ गावांचा पुणे मनपाच्या हद्दीत समावेश करण्यात आला. पुण्याने भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत आता मुंबईलाही मागे टाकलं आहे.

 

हद्दवाढीनंतर पुणे शहराचं भौगोलिक क्षेत्रफळ आता ५१६.१६ चौरस किलोमीटर झालं आहे. २३ गावांचा महापालिका हद्दीत नव्याने समावेश करण्यात आल्याने ह्या क्षेत्रफळात वाढ झाली आहे. मुंबईचं भौगोलिक क्षेत्रफळ ४४० चौरस किलोमीटर असून आता पुण्याने मुंबईलाही मागे टाकलं आहे. नव्या हद्दवाढीमुळे पुणे आता देशातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी सातव्या क्रमांकाचं शहर बनलं आहे.

 

नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की, पुणे महापालिकेचं २०२१-२२ या वर्षाचं बजेट ८,३७० कोटी आहे तर मुंबई महापालिकेचं बजेट ३९,०३८ कोटी आहे.

 

महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जानेवारी महिन्यात काढली होती. त्यानंतर गावांच्या समावेशाबाबत हरकती-सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. हरकती-सूचनानंतर प्रत्यक्ष सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठविण्यात आला. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये गावांचा समावेश तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

खालील गावं आता पुणे शहरात समाविष्ट करण्यात आलेली आहेत- म्हाळुंगे ,सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

वरील सर्व गावांच्या संपूर्ण महसूल क्षेत्राचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात येणार आहे.

 

Exit mobile version