Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (वृत्तसंस्था) प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

भाजप प्रदेश कार्यकारिणीची काल पहिली बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे. मात्र चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता आहेत. ते पुढे म्हणाले की, एकत्र निवडणूक लढवायच्या, मोदींच्या व्होटबँक, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा घ्यायचा. मग तुम्ही विरोधी पक्षात राहिला असता तर चालले असते. ज्यांच्याविरोधात लढलात, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. चौथीतल्या मुलाला निबंध लिहायला सांगितला तरी तो लिहिल की सध्याचे सरकार राज्याचे हित पाहत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात. ही सगळे पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर सरकार नीट चाललंय की नाही हे चौथीतला मुलगा किंवा मुलगी सुद्धा निबंध लिहिल,असेही पाटील म्हणाले. “आम्ही आज विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवून, मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला. जर एकत्र यायची वेळ आली, तरी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढणार नाही. निवडणुका झाल्यानंतर दोघांची मेजॉरिटी झाली नाही, तर एकत्र येऊ शकतात. शिवसेनेने निवडणुका एकत्र लढवून पळ काढला”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Exit mobile version