Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय- सुप्रिया सुळे

मुंबई : वृत्तसंस्था । राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जोरदार टीका केली आहे.

खरं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय. या देशात केंद्रसरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लगावला.

दरम्यान लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, कॅटरर्स यांना दिलासा मिळेल असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

Exit mobile version