Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव टीमने पटकावले ३१ पदक

जळगाव, प्रतिनिधी | सोलापूर येथे नुकतेच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ८ व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत पदकं पटकावले आहे.
जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले.

 

स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमतर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून ९८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा), तुषार पाटील यांना सिल्व्हर मेडल (धरणगाव), गौरव पाटील गोल्ड मेडल (अमळनेर), बॅडमिंटन स्पर्धेत वरून महाजन यांना गोल्ड मेडल (अमळनेर). कुस्ती स्पर्धेत पै.प्रतीक पाटील यांना सिल्व्हर मेडल ( अमळनेर), पै.महेश वाघ यांना ५७ किलो गटात गोल्ड मेडल (धरणगाव), पै.अमोल महाजन यांना ६० किलो गटात गोल्ड मेडल ( धरणगाव), पै.भावेश कोळी यांना ५१ किलो गटात सिल्व्हर आणि ५५ किलो गटात गोल्ड मेडल(धरणगाव), पै.राजेंद्र माळी ५१ किलो गटात ब्राँझ मेडल (धरणगाव). आर्चरी स्पर्धेत अंडर १७ गटात घनश्याम मराठे यांना गोल्ड मेडल (चोपडा), कमिश बारेला यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), दीपक पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा) तसेच अंडर १९ गटात शिवाजी वाघ यांना गोल्ड मेडल (चोपडा), जयेश पाटील यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), चेतन पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा), अंडर २५ गटात चेतन पाटील यांना गोल्ड मेडल (चोपडा). ॲथलेटीक्स स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातील चौगाव ता.चोपडा येथील विशाल पारधी (५ किमी.धावणे, गोल्ड मेडल), शुभम पाटील (१०० मी. धावणे, सिल्व्हर व २०० मी. धावणे, ब्राँझ मेडल), वासुदेव कोळी (१० किमी.धावणे, ब्राँझ मेडल) उमेश धनगर (३००० मी. धावणे, सिल्व्हर मेडल), मारवड ता.अमळनेर येथील कुंदन शिरसाठ (ब्राँझ मेडल) मिळाले असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे कोच पवन पाटील सर (चोपडा), पै.संदीप कंखरे सर (धरणगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा टीमच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Exit mobile version