Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय स्कॉश स्पर्धेसाठी यश हेमनानीची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेल्या १७ वर्षाखालील ओपन स्कॉश स्पर्धा जिंकणाऱ्या व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथील विध्यार्थी यश हेमनानी याची येत्या जानेवारी मध्ये खेळविण्यात येणाऱ्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय अंतिम स्कॉश स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विभागीय निवड चाचणी शिबीर आणि खेळाडूंमध्ये सामने खेळविण्यात आले, यात यश हेमनाणीने अपराजित राहून सर्व प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला. यश हेमनाणी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा प्रतिभाशाली युवा स्कॉशपटू आहे, त्याच्या या यशासाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे या विध्यार्थ्यांला मागदर्शन लाभले.

Exit mobile version