Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार अब्दुल करीम सालार यांना जाहीर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

अब्दुल करीम सालार यांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलेले आहे. त्यांची सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक, विविध जाती धर्म व समाजात आपल्या आपुलकीच्या स्वभावाने प्रत्येकाला प्रभावित करणारे राजकीय व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अशी ओळख आहे. अब्दुल करीम सालार यांच्या एकूण कारकीर्द दखल घेत नाशिकच्या राज्यस्तरावरील शिवपुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थाने त्यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार घोषित केला आहे. आज ते वयाच्या 68व्या वर्षी तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने अब्दुल करीम सालार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version