Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय “महात्मा फुले’ पुरस्कारासाठी बिऱ्हाडेंची निवड

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील कुंझर येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील शिक्षक लक्ष्मीकांत बिऱ्हाडे यांची नुकतीच राज्यस्तरीय “महात्मा फुले’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील कुंझर येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात लक्ष्मीकांत रामकृष्ण बिऱ्हाडे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. याचीच दखल घेऊन त्यांची “महात्मा ज्योतिराव फुले’ राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार -२०२३ साठी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील प्राप्त झाल्याचे बिऱ्हाडे यांनी कळविले आहे. या निवडीने पंचक्रोशीतील नागरिकांसह आप्तेष्टांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून येत्या ५ मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात बिऱ्हाडे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version