राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील मुलं आणि महिलांची निवड जाहीर

जळगाव, प्रतिनिधी ।  हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे  येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची  तर महिलांमध्ये सहा मुलींची निवड हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी शनिवारी घोषित केली.

 

निवड समिती सदस्य म्हणून राज्य प्रशिक्षक अरविंद खांडेकर , एनआयएस प्रशिक्षक लियाकतअली सय्यद, इकराचे क्रीडाशिक्षक मुजफ्फर शेख, निवड करून अंतिम यादी हॉकी जळगाव यांना सुपूर्द केली. मुलांचा संघ हा १३ सप्टेंबरला जळगावहून रवाना होत असून प्रशिक्षक म्हणून सय्यद लियाकत अली व व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार हे काम बघणार आहेत. महिलांचा संघ १६ सप्टेंबर रोजी रवाना होत असून या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून मुजफ्फर शेख व  व्यवस्थापक म्हणून राष्ट्रीय खेळाडू वर्षा सोनवणे या असणार आहेत.  एका छोटेखानी कार्यक्रमात या खेळाडूंना फुटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले त्यावेळेस फुटबॉलचे प्रशिक्षक राहील शेख, हॉकीचे प्रशिक्षक मुजफ्फर शेख, सत्यनारायण पवार व हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती.

निवड झालेले खेळाडू

ज्युनिअर बॉईज

मोहम्मद तौसीफ शकील कुरैशी, फ़राज़ फ़िरोज़ तड़वी ( सर्व भुसावळ), चेतन विलास माळी, धीरज धनराज जाधव, गणेश कांतिलाल चौधरी, हरिप्रकाश शिवपाल सैनी, दिवेश चौधरी, अबरार सय्यद जावेद, (सर्व जळगाव), मोइन खान (राखीव खेळाडू, भुसावळ).

सीनियर मूली

वर्षा भगवान सोनवणे, कोमल मनोज सोनवणे, सरला रविन्द्र असवार, गायत्री अर्जुन असवार, वैष्णवी संतोष चौधरी, चेतना मछिन्द्र सपकाळे आरती शिवाजी ढगे ( सर्व जळगाव).

 

Protected Content