Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेत धरणगावच्या महेश वाघ व सौरभ पवार यानी पटकविले सुवर्णपदक

जळगाव, प्रतिनिधी । नुकत्याच पनवेल येथे राज्यस्तरीय  कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हातर्फे धरणगाव येथील कुस्तीपटू सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेत धरणगावातील दोघा कुस्तीपटूंनी गोल्ड मेडल मिळविले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्टेटतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत  धरणगाव येथील महेश रमेश वाघ(५५ किलो) व  सौरभ राजेंद्र पवार(५७ किलो)  गटात  गोल्ड मेडल मिळविले आहे.  शितांशू शिवाजी चौधरी (३८ किलो), दीपक रावसाहेब खैरनार(५१ किलो), चैतन जिजाबराव माळी (६३ किलो) गटात यांना   सिल्व्हर मेडल मिळाले. जळगाव जिल्हा स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व झोनल इंचार्ज दिव्या भोसले  व जिल्हा सचिव योगेश चौधरी व कुस्ती कोच संदीप कंखरे यांच्या मार्गदर्शनखाली सहभागी झाले होते.राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याने सुवर्णपदक जिंकले आहे. जळगाव जिल्ह्यातून या स्पर्धेत ८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील ५ कुस्तीपटूनी  मेडल जिंकले आहे. यानंतर १७, १८  व १९  स्पटेंबरला रोहतक हरियाणा येथे नॅशनल स्पर्धा होणार आहे असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी सांगितले. विजयी कुस्ती खेळाडूंचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

 

Exit mobile version