Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते.

 

अमर सिंह यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र नंतर हे संबंध बिघडले. त्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात सिंह यांनी माफी मागत बच्चन परिवाराची माफी मागितली होती.

Exit mobile version