Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपाल महोदयांनी माफी मागावी – युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  काल  राज्यपाल भगवान कोशारी यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान १२ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान होईल असे वक्तव्य केलं असून याचा  आम्हीयाचा  निषेध व्यक्त असे जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

 

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष  देवेंद्र मराठे प्रसिद्धीपत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य व प्रामुख्याने मुंबई तिने कधीही कुठल्याही व्यक्तीच्या जाती-धर्माचा विचार न करता व मतभेद न करता भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्व जातीपाती धर्माच्या लोकांना आश्रय दिला आहे.   परंतु, राज्यपाल भगवान कोशारी यांनी केलेल्या वक्तव्या दरम्यान केवळ राजस्थानी व गुजराती लोकांकडेच पैसा आहे व या लोकांना बाजूला केले तर महाराष्ट्रात व प्रामुख्याने मुंबईमध्ये पैसा राहणार नाही व मुंबई ही जी भारताची राष्ट्रीय आर्थिक राजधानी आहे ही राहणार नाही अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य केले आहे.  राज्यपाल पद हे संविधानिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं पद असतं, राज्यपाल पदावरती असलेल्या व्यक्तीने राज्यपाल पदाची गरिमा कधीही कमी होऊ नये या पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे. , परंतु, राज्यपाल पदाची जबाबदारी जेव्हापासून भगवान कोशारी  यांनी घेतली तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांनी या पदाची गरिमा कशी कमी होईल या पद्धतीचा कृत्य केलेलं हे.  राज्यपाल पदावरती असलेल्या व्यक्तीला त्या राज्यातील सर्व जाती धर्माची जनता ही सर्व समान असते. त्याच पद्धतीने ही व्यक्ती कुठल्याही पक्षाची अथवा कुठल्याही पंथाची एकाच बाजूने साथ देऊ शकत नाही.  या व्यक्तीला  राज्यातील सर्व जनता त्याच पद्धतीने सर्व राजकीय पक्ष हे सर्व समान असतात. परंतु भगवान कोशारी  यांनी मात्र या संपूर्ण तत्वांना तिलांजली  देत त्यांनी केवळ त्यांना योग्य वाटत त्याच पद्धतीचा कारभार संपूर्ण राज्यामध्ये सुरू ठेवलेला आहे.  त्याच्याच माध्यमातून त्यांनी काल हे बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण १२ कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे.  जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र राज्यातील १२  कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी या पद्धतीची मागणी देखील जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केलेली आहे.

Exit mobile version