Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांच्या भेटीसाठी शरद पवार राजभवनावर

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

 

कोरोना परिस्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सोमवारी सकाळी अचानकपणे राजभवनात दाखल झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच शरद पवार यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. या विनंतीला मान देऊन पवार राजभवनावर आले होते. दरम्यान, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नव्हते.

Exit mobile version