Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांची हकालपट्टी करा : भाजप खासदारांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील भाजपच्या काही खासदारांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

राज्यातील काही खासदार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून या संदर्भात टिव्ही-नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातील खासदार अचानक पतंप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावादाची ठिणगी उडत आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या वादात तेल ओतण्याचं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनासोबत या मुद्द्यावर महाराष्ट्रातील खासदार चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितल्याचे या वृत्तामध्ये नमूद केलेले आहे.

Exit mobile version