Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजोरा जिल्ह्यात लसीकरणात अव्वल : जि. प. अध्यक्षांनी केले कौतुक

यावल,   प्रतिनिधी  । तालुक्यातील राजोरा हे गावा जळगाव जिल्ह्यातील पहीले १०० टक्के कोवीड१९च्या पार्श्वभुमीवर लसीकरण करणारे गाव ठरले आहे. या गावाला  जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांनी भेट देवून  प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या स्थानिक आरोग्य पथकाचे कौतुक केले.

 

मागील दिड वर्षापासून संपुर्ण देशासह राज्यात देखील कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातला आहे.  या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागली. अनेकांची कुटुंब उद्धवस्थ झालीत. हा विनाशकारी  कोरोना संपुष्टात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.  यात महाराष्ट्र राज्य हे देशातले कोरोनाच्या गोंधळात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणारे पहीले राज्य ठरले आहे.  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातुन अत्यंत वेगाने कोवीशील्ड  या लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवुन उल्लेखनिय कार्य केले.   यावल तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणारे राजोरा उपकेन्द्राने गाव आणि परिसरात  नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के लसीकरणाचे कार्य केले आहे.

पहीले कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम हे दिनांक ८ एप्रिल  २०२१ १८ ते ४४ वर्षाच्या वयोगटातील १९९ दि.  २३एप्रिल  २०२१ला ५९ वर्ष वयोगटाच्या १८४ नागरीकांना त्याचप्रमाणे ६० वर्ष वयोगटातील २०२ जणांना तर गरोदरमातांना दि. १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत असे सर्व वयोगटातील ५८५ पैक्की ५८५ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.   तर १५ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत दुसरे  लसीकरण ५५० नागरीकांनी घेतले असून  असे लसीकरणच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेत उत्कृष्ट कार्य करणारे राजोरा हे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे.

या आरोग्य सेवेच्या उत्कृष्ट कार्यासाठी भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक्षा सुरुशे , डॉ. प्राजक्ता चौहान , डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजोरा उपकेन्द्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाकीर हुसैन पिंजारी, आरोग्य सहाय्यक राजेन्द्र पालवे, आरोग्य सेविका श्रीमती के. आर. बोरोले , श्रीमती एस. एस. पाटील ,  वैशाली महाजन , आरोग्य सेवक अलताफ देशपांडे त्याचप्रमाणे आशा कार्यकर्ता  मनिषा महाजन ,  मंगला सोनवणे ,  आशा पाटील ,  ज्योती ठाकरे , हेमलता नारखेडे , किरण नेहते , हर्षल सोनवणे यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

दरम्यान जिल्हा परिषदच्या अध्यक्ष  रंजना पाटील यांनी या ठिकाणी  भेट देवून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.  त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त ब्ऱ्हाटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांचे स्वागत सरपंच  पुष्पा गिरधर पाटील, उपसरपंच दिनेश सिताराम पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लक्ष्मण सोनवणे,  रोहीणी वासुदेव बोरोले, सुनंदा भगवान पाटील ,  सुवर्णा संजय महाजन , ग्रामसेवक पी. पी. चौधरी, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील  यांनी केले.

Exit mobile version