Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत पॅड बँकेचे उद्घाटन!

*पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषदेत शाळेने अनोख्या संकल्पनेचा शुभारंभ केला आहे. किशोरवयीन मुली वा महिलांसाठी पॅड बँकेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील राजुरी जि. प. प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शाळेत गावातील किशोरवयीन मुली व महिला यांच्यासाठी पॅड बँकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी घेण्यात आलेला किशोरी वा महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा संघटना जिल्हाध्यक्षा ललिता पाटील हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष सरला पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रा. वैशाली बोरकर व तालुका सचिव वैशाली जडे तसेच गटसाधन केंद्र पाचोरा येथून दिव्यांग तालुका समन्वयक सीमा पाटील व दिव्यांग विशेष शिक्षक सुनीता पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील किशोरवयीन व महिलांसाठी गावात कुठलीही मेडिकल ची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना वरखेडी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पॅड आणावे लागतात. मासिक पाळी दरम्यान पॅड वेळेवर मिळत नसल्याने आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. ही गरज लक्षात घेऊन त्यांना सॅनिटरी पॅडची ही सुविधा गावाच्या शाळेत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापक अरुणा उदावंत व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर पाटील व नूतन चौधरी यांच्या सहकार्याने शाळेतच पॅड बँक तयार करण्यात आली‌ आहे. या स्तुत्य उपक्रमाचे गावातील सर्व महिला व किशोरवयीन मुलींनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे. यावेळी केंद्र शाळेतील शिक्षिका वंदना सोनवणे, कुमुदिनी पाटील, स्वाती पाटील, कविता कदम, उज्वला परदेशी यांनी उपस्थिती देऊन पॅड बँकेसाठी काही सॅनिटरीपॅडची त्यांच्यातर्फे मदत केली. दरम्यान अध्यक्षीय भाषणात बोलतांना ललिता पाटील यांनी महीला व मुलींविषयी कायद्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले. तसेच गावातील किशोरवयीन मुलींसाठी स्पर्धा परीक्षा तयारी ची पुस्तके देऊ केली. वरील सर्व मान्यवरांनी गावातील सर्व भगिनींना मुलींच्या सुरक्षेबरोबरच मुलींवर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संस्कार करण्याची खूप गरज आहे‌ असे समजून सांगितले. सीमा पाटील यांनी दीव्यांग प्रकार व त्यांना मिळणारे शाळेमार्फत विविध भत्ते याबद्दल माहिती दिली. त्याच बरोबर महिलांविषयक कायदे मुलीं विषयक शिक्षणाच्या वाटा आणि संस्कार यावरही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सावखेडा खु” शाळेच्या उपशिक्षिका गोसावी मॅडम यांनी केले. तर प्रास्ताविक उदावंत यांनी केले. उपस्थितांचे आभार नूतन चौधरी यांनी मानले.

याप्रसंगी सावखेडा शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे, वाडी शाळेचे उपशिक्षिका श्यामल सलादे, राजश्री आहेर, वैशाली ठाकरे उपस्थित होते. सॅनिटरी पॅड बँकेचे उद्घाटन सतत चार पंचवार्षिक पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येत असलेल्या जैनाताई तडवी यांनी केले. पॅड बाजारभाव पेक्षा कमी किंमतीत निधी फाऊंडेशन, जळगाव च्या संचालिका वैशाली विसपुते यांनी उपलब्ध करून दिले तर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य कविता पाटील, अमृता पाटील, शेनापदाबाई उभाळे, सुरेखा पाटील, पोलीस पाटील मनीषा उभाळे, अंगणवाडी ताई मालु पाटील, माजी सरपंच वैशालीताई पाटील, निर्मला पाटील, शोभा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य आणि गावातील महिला व किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती. याप्रसंगी शाळेने संक्रांत सणाचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेतला तसेच महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व महिलांनी व मुलींनी शाळेत माहेर चा आनंद घेतला. अल्पोहार व चहा पानी त्यांनी कार्यक्रमाचा समारोप झाला. राजूरी टीमने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे तसेच पंचक्रोशीतील लोकांनीही कौतुक केले.

Exit mobile version