Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजस्थानात २७० कोटी किंमतीचे हेरोईन जप्त

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राजस्थानात बीकानेरच्या भारत – पाक  सीमेवर सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानी तस्करांकडून ५६ किलोहून अधिक हेरोईन जप्त केलंय.  त्याची  किंमत तब्बल २७० कोटी रुपये असल्याचं समोर येतंय.

 

बीकानेरलगत भारत – पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकी बंडली भागात ही तस्करीची घटना उघडकीस आलीय.

 

२-३ जून रोजी रात्री उशिरा ड्युटीवर तैनात असणाऱ्या जवानांना तारेजवळ काही हालचाल होत असल्याचा संशय आला. बीएसएफ जवांनानी शोधाशोध सुरु करत आवाजाच्या दिशेनं फायरिंग केलं. परंतु, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर पाकिस्तानकडे पळून गेले.

 

 

या भागाच्या तपासणीत ५४ पाकिटांत ५६ किलो ६३० ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. ही पाकीट बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतली आहेत. बीएसएफनं नोंदही केलीय. राजस्थान सेक्टरचे महानिरीक्षक पंकज गुमर यांनी जवानांच्या सतर्कतेचं कौतुक केलंय.

 

 

 

याच वर्षी ७-८ फेब्रुवारी रोजी रात्री असाच एक घुसखोरीचा प्रकार सुरक्षा दलानं उधळला होता. बीकानेर सीमेवर ५ मार्च आणि २० मार्च रोजी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका – एका घुसखोराला बीएसएफनं टीपलं होतं.

 

Exit mobile version