Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजवड येथिल जि. प. प्राथमिक शाळेतर्फे “हर घर तिरंगा” अंतर्गत प्रभात फेरी व पथनाट्य

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, राजवड येथे “हर घर तिरंगा” उपक्रम प्रचारार्थ प्रभात फेरी व पथनाट्य करण्यात आले.

तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथे येथे 8 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8 वाजता सर्व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या मुखस्थानी नेते, खेळाडू व प्रसिद्ध व्यक्तीची, वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी होते.

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, झाशी कि राणी, शिरीष कुमार, जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कृषी भूषण नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, कवियत्री बहिणाबाई चौधरी, प्रतिभाताई पाटील,किरण बेदी, बेदी, सानिया मिर्झा यांची वेशभूषा धारण करून त्यांची प्रसिद्ध अशी कोट्स व माहिती विद्यार्थ्यांनी सांगून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा लावा असे आवाहन केले. व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी विनंती केली.

सदर पथनाट्य बस स्टँड, ग्रामपंचायत, राजवड गावातील प्रत्येक गल्लीत, जुना प्लॉट एरिया, नवीन प्लॉट एरिया येथे सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण राजवड गावात घोषवाक्य देत.., देशभक्तीचे वातावरण तयार केले.

सदरहू उपक्रमाची कृषी भूषण साहेबराव पाटील, आमदार अमळनेर व जिजामाता कृषी भूषण पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा अमळनेर, यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. तर हरीदादा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पालक सर्व लहान थोर मंडळी यांनी पथनाट्य बघण्याचा आनंद घेऊन कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाची संकल्पना मुख्या. वैशाली बोरसे यांची असून सरदार सरांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. चौधरी सर बहादरपूरकर यांनी माईक व स्पीकरची व्यवस्था करून दिली.

Exit mobile version