Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजनंदिनी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील ६२ मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कारने गौरव

जळगाव, – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१-२२ वितरण सोहळा अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आला होता.

 

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१-२२ वितरण सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यात राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, गुणवन्त कर्मचारी पुरस्कार, दीपस्तंभ पुरस्कार, क्रीडा गौरव पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, नारीरत्न पुरस्कार पुरस्कार, गुणवन्त शिक्षक पुरस्कार असे एकूण ६२ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, हैदर तडवी, राजनंदिनी फाउंडेशन अध्यक्षा संदीपा वाघ, ज्ञानेश्वर वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप पाटील सर मानले.

Exit mobile version