Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजगृहावर हल्ला प्रकरणी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे निषेध (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही माथेफिरू गुंडांनी हल्ला करून नासधूस केली होती. याचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना अटक करून कडक करावाई करावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महसंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृहावर गेल्या आठवड्यात काही माथेफिरू गुंडांनी हल्ला करून नासधूस केली व झाडाच्या कुंड्या, खिडक्या, काचा व सीसीटीव्ही कॅमेरा फोडून नुकसान केले. अशा समाजकंटकांना पोलीसांकडून अटक करून कडक शासन करावे अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंग संपुर्ण राज्यात या घटनेविरूध्द आंदोलन करेल अशा इशारा देण्यात आला. या निवेदनावर महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रदेशाध्यक्ष पांडूरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष भागवान बाविस्कर, बी.बी.मोरे, तालुकाध्यक्ष मधुकर वाघ, कैलास वाघ, संजय वानखेडे, गलू ठोसर, गिरीष भोसले, किशोर धोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version