Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजगृहावरील तोडफोडीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध

चोपडा,प्रतिनिधी । विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावर दगडफेक करून नुकसान केले आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या कृत्याचा चोपडा शहर व तालुका काँग्रेसने तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध केला आहे. संबंधित आरोपींना तात्काळ जेरबंद करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.

तालुका अध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, महेमूदअली सय्यद शहर ऊपाध्यक्ष काँग्रेस शेतकरी सेलचे शशिकांत शांताराम साळुंखे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. निवेदनावर मार्केट कमिटी माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे , सूत गिरणी संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, शेख अ . हमीद वाहेद , कांतिलाल जगतराव सनेर, तालुका युवक अध्यक्ष किरण प्रतापराव सोनवणे, नरेंद्र छगन पाटील, कलींदर समशेर तडवी, फकिरा रामदास पाटील, जिजाबराव बळीराम पाटील, संजीव गुलाबराव सोनवणे, दिलीप युवराज पाटील, किरण गोविंदा बागुले , गणेश भगवान धनगर, सुनील सिताराम बागुले, वासुदेव साहेबराव बागुल, देवानंद धनसिंग शिंदे, रमेश डिगंबर पाटील, रमेश एकनाथ शिंदे, मधुकर विठ्ठल बाविस्कर, सोपान भरत पाटील,अॅड.संदेश जैन, अशोक साळुंखे, जितेंद्र जैन, एनएसयूआय अध्यक्ष चेतन बाविस्कर, मा . नगरसेविका फातिमा ताई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version