Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राखीव वनात बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात मध्यरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केली होती. याप्रकरणी दोघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली असून वनकायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुभाष भावसिंग पावरा (वय-३७) आणि नानभाउ राजमला पावरा (वय-३६) दोघे रा. धुळे ( पावरी वाडा) सध्या मुक्ताईनगर जि. जळगाव अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

18 नोव्हेंबर,2020 रोजी विवेक वि. होशिंग उपवनसंरक्षक प्रा. जळगाव राजेंद्र ग.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव तसेच श्री आशुतोष रा. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा (अति. कार्यभार) यांनी घटणास्थळी भेट देवुन झालेल्या अवैध वृक्ष तोडीची जागेवर जावुन पाहणी केली असता वरील प्रमाणे दोघे आरोपी यांना ताब्यात घेतले सदर आरोपी वनक्षेत्र वडोदा अतर्गत वनकस्टडी येथे चौकशी कामी घेण्यात आले त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना दिनांक 19 नोव्हेंबर,2020 रोजी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कार्यवाही दिगंगर वा. पगार, वनसंरक्षक प्रा. धुळे श्री. विवेक वि. होशिंग उपवनसरंरक्षक प्रा. जळगाव मेश वावरे विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, राजेंद्र ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव आशुतोष र. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा ( अति. कार्यभार), भावना मराठे वनपाल कुऱ्हा, डीगंबर पाचपांडे वनपाल चारठाणा, विजय अहीरे वनरक्षक राजुरा, डी. एस. पवार वनरक्षक वायला यांच्या मदतीने ही कार्यवही करण्यात आली. सदर वनगुन्हया प्रकरणी पुढील तपास श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा यांनी कळविले आहे.

Exit mobile version