Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राकेश मारियांना मिळाली होती गुलशन कुमार यांच्या हत्येची पूर्वसुचना ?

rakesh mariya

मुंबई प्रतिनिधी । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात आपल्याला कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्या हत्येची आधीच पुर्वसूचना मिळाली होती असा दावा केला आहे.

राकेश मारिया यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेट मी से ईट नाऊ या पुस्तकातील एका उल्लेखानुसार कॅसेटकिंग गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची माहिती आपल्याला आधीच मिळाली होती असं राकेश मारियांनी म्हटलं आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है अशी माहिती मला माझ्या संपर्कात असलेल्या एका खबर्‍याने दिली होती. मी त्याला विचारलं कौन गिरानेवाला है विकेट? तर त्याने उत्तर दिलं अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहींपे काम खतम करने वाले है.. अशी माहिती मला खबर्‍याने दिली. ज्यानंतर मी त्याला विचारलं की खबर पक्की है क्या? तर तो म्हणाला साहब एकदम पक्की खबर है, नहींतो आपको कैसे बताता? मी त्याला म्हटलं की और कुछ खबर मिले तो बताना असं म्हणून मी त्याचा फोन ठेवला आणि विचारात पडलो की आता काय करावं? दुसर्‍या दिवशी सकाळी मी पहिला फोन महेश भट्ट यांना केला. त्यांनाविचारलं की तुम्ही गुलशन कुमारना ओळखता का? ते म्हणाले हो.. मी त्यांचा एक सिनेमाही दिग्दर्शित करतो आहे. त्यांनी मला गुलशन कुमार हे रोज शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात ही माहिती दिली. त्यानंतर मी तातडीने गुन्हे शाखेला कळवलं की गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करा. तसेच मला त्यांच्याबाबतची माहिती पुरवत राहा. मात्र १२ ऑगस्ट १९९७ ला मला फोन आला आणि माहिती मिळाली की गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली आहे. यानंतर केलेल्या तपासणीत उत्तर प्रदेश पोलीस आणि कमांडो हेदेखील गुलशन कुमार यांचे संरक्षण करत होते. काही महिने उलटल्यानंतर गुलशन कुमार यांच्यावरचा जीवाचा धोका टळला असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते काहीसे बेसावध राहिले आणि हीच संधी साधून गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. गुलशन कुमार यांची हत्या करण्याचा जसा कट आखण्यात आला होता तोच कट प्रत्यक्षात राबवला गेला असे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version