Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राका हायस्कुलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती शिबीर

बोदवड, प्रतिनिधी | स्वातंत्रयचा अमृत महोत्सवानिमित्त नथमल हजारीमल राका हायस्कुल  येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

तळागाळातील नागरीकांमध्ये मुलींच्या हक्क आणि अधिकारांबद्दल विधी सेवेची जनजागृती व्हावी याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमामध्ये बोदवड न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश  के.एस.खंडारे , सरकारी अभियोक्ता कलंत्री, बोदवड बार अससोसिएशन अध्यक्ष अॅड.अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अॅड. धनराज प्रजापती, अॅड.के.एस.इंगळे, राका हायस्कुलचे प्राचार्य श्री.एन.ए.पाटील सर, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अॅड. संतोष कलंत्री यांनी विधी सेवा व मुलींचे हक्क व अधिकार तसेच बेटी पढाओ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.अर्जुन पाटील यांनी विधी सेवा समिती विषयी व मुलींचे कायदे या विषयावर भाषण केले. अॅड.प्रजापती, अॅड.इंगळे व मिना बडगुजर  यांनी मुलींकरीता असलेले विवीध योजना व मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती, मुलींचे हक्क व अधिकार यावर मार्गदर्शनक केले. प्राचार्य श्री.एन.ए.पाटील सर यांनी विदयार्थीनींना मार्गदर्शन केले व त्यांच्यावर काही अन्याय होत त्याची वाच्याता करावी व आवश्यकता असल्यास त्यांना विधी सेवेचा लाभ घेतला येईल हे सांगीतले. न्यायाधीश  के.एस.खंडारे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बेटी बचाओ, बेटी पढाओ व मुलींना कायदयाचे ज्ञान व्हावे त्याकरीता असलेले विविध कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. शाळेच्या विदयार्थीनी कु.मोहीनी बडगुजर, ज्योती पाटील. पुजा कोल्हे यांनी उत्स्फुर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक  व सुत्रसंचलन  भुसारे मॅडम यांनी केले. आभार कोंगे मॅडन यांनी मानले. यशस्वीतेसाठी बोदवड न्यायालयातील विधी सेवा प्राधीकरणचे एस.एस.परसे, कैलास बाविस्कर, विशाल चौमे तसेच राका हासस्कुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version