Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत असतांना हॉर्न वाजविला ; चाकू, तलवारीने भोसकून तरुणाची निर्घुण हत्या

लासलगाव (वृत्तसंस्था) लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक दहा-बारा जण रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी एका कार चालक तरुणाने हॉर्न वाजवला म्हणून त्याची चाकू, तलवारी सारख्या हत्याराने वार करत हत्या करण्यात आली.

 

मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास पिंपळगाव नजीक येथील खाजगी चार चाकी गाडीवर चालक म्हणून काम करणारा 30 वर्षीय चेतन बाळू बैरागी हा त्याचा मित्र आकाश शेजवळ यांच्यासमवेत आपल्या घराकडे ईरटीगा कारने जात होते. पिंपळगाव नजीक मधील इंदिरानगरच्या रस्त्यावर साहिल इम्रान शेख याचा वाढदिवस सुरू होता. यावेळी त्याच्या सोबत फिरोज अकबर शहा ,इमरान सलीम सय्यद, रोहित शिरसाट, कृष्णा वरपे ,अरुण माळी, राजू राजळे, काळू लहाने, दत्तू जाधव व इतर तिघे संशयित हे केक कापत होते. दरम्यान चेतन बैरागी याने त्याच्या गाडीचा हॉर्न वाजवल्याचा राग येऊन या सर्व युवकांनी त्यांच्याशी वाद घातला. तसेच हातातील चाकु तलवारी सारख्या हत्याराने चेतन बैरागी याच्यावर वार केले. तर त्याच्यासोबतच असणारा आकाश शेजवळ हा जखमी आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चेतनला तातडीने उपचाराकरिता नाशिक येथे पाठविण्यात येत असतानाच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version