Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यावरील मुरूम काढण्यावरून तिघांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यावरील मुरूम काढण्याच्या कारणावरून तीन जणांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील जुगलखेडा ते कडगाव रस्त्यावर घडली आहे. या संदर्भात गुरुवार १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जुगलखेडा ते कडगाव रस्त्यावर जेसीबीच्या मदतीने मुरूम काढण्याचे काम सतीश भगवानराव खंडवेकर, मुकेश अरुण कोळी आणि अभिषेक कल्याण अलाट हे गुरुवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता काम करत होते. त्या ठिकाणी नवल कोळी, कोमल कोळी रा. कडगाव आणि त्यांच्यासोबत असलेले अनोळखी दोन जण यांनी मुरूम काढण्याच्या कारणावरून तिघांना अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यानंतर सतीश भगवानराव खंडवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नवल कोळी, कोमल कोळी यासह इतर अनोळखी दोन जण यांच्या विरोधात रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूरखान करीत आहे.

Exit mobile version