Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी ते पिंपळगाव आणि पिंपळगाव ते घोडगाव या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याची चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्‍वर धर्मा बागुल यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे.

या संदर्भात सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्‍वर बागूल यांनी म्हटले आहे की, रोहिणी ते पिंपळगाव आणि पिंपळगाव ते घोडगाव यांना जोडणार्‍या रस्त्याचे काम सुरू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. यात मुरूमाऐवजी काळी माती वापरली जात आहे. या संदर्भात गावकर्‍यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने अरेरावीची उत्तरे दिली. यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Exit mobile version